रायगड – भारतीय जनता पक्षाला रायगडमध्ये मोठा फटका बसला आहे. भाजपमधील 10 नगरसेवक रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अपात्र ठरविले आहे. या नगरसेवकांनी शिवसेनेतून भाजमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना ऐन निवडणूकीच्या तोंडावर अपात्र ठरविल्यामुळे मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
भाजपने राजगडमध्ये शिवसेनेवर फास टाकत 10 गरगसेवकांना गळाला लावले होते. मात्र तोच फास त्यांच्यावर उलटा पडल्याचे आता दिसून येत आहे. शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या या 10 नगरसेवकांना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अपात्र ठरविले आहे. याचा माथेरान नगरपालिकेत भाजपला मोठा फटका बसला आहे.
शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी कोल्हापूरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र ऐन निवडणूकीच्या तोंडावर या नगरसेवकांना अपात्र ठरविले गेले त्यामुळे या नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यावर गदा आल्याचे दिसून येत आहे. सोबतचा याचा फटका भाजपला सुद्धा बसला आहे.