नवी दिल्ली – जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात सर्वप्रथम चीनमध्ये आढळलेल्या या कोरोना विषाणूचा फैलाव आता जवळपास जगभरातील सर्वच देशांमध्ये झालाय. अवघ्या जगाला वेठीस धरलेल्या या कोरोना विषाणूवर कधी एकदा लस येते याकडे समस्त मानव जातीचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना विषाणूवरील लस शोधण्यात संशोधकांना लवकरच यश येईल असा आशावाद व्यक्त केला आहे.
भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गुजरात जनसंवाद कार्यक्रमामध्ये बोलताना मंत्री गडकरी यांनी हा विश्वास व्यक्त केलाय. “भारतातील व जगभरातील संशोधक कोरोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असून मला विश्वास आहे की संशोधकांना कोरोनावरील लस शोधण्यात लवकरच यश येईल.”
The corona crisis will not last long. Our scientists & scientists in other countries are working day and night to develop the vaccine. I am confident that we will get the vaccine very soon: Union Minister Nitin Gadkari at ‘Gujarat Jan Samvad’ rally via video conference pic.twitter.com/NwGbSRLACB
— ANI (@ANI) June 14, 2020