नीलकमल (पटना): बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील त्यांच्या घरामध्ये आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. या बातमीनंतर सुशांतच्या बिहारमधील घरात खळबळ उडाली. सुशांतने असे पाऊल उचलले यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. त्याच्या घरी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. सुशांतच्या वडिलांना आपला मुलगा या जगात नाही, यावर विश्वास बसत नाही.
सुशांतचे मामा आरसी सिंह म्हणाले की, सुशांत’ने आत्महत्या केली नाही, तर त्याला मारले गेले. तसेच त्यांनी सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या मॅनेजरने आत्महत्या केली होती, परंतु त्यांचीही हत्या करण्यात आली, असे सुशांतच्या मामा म्हणाले.
ते म्हणाले की, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, सीबीआय चौकशी व्हावी, अशी राजपूत महासभेची मागणी आहे. अलीकडेच त्याच्या मॅनेजरने आत्महत्या केली, त्यानंतर त्याच्यावर प्रचंड दबाव होता. सुशांतसिंग राजपूत यांचे मामा पुढे म्हणाले की, तो इतका धाडसी माणूस होता की तो आत्महत्या करू शकत नाही, म्हणून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.