नवी दिल्ली – भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज 80 सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचाही समावेश झाला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातून अलिकडेच वगळण्यात आलेले हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर हे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अजूनही कायम आहेत. याशिवाय राज्य पातळीवरील नेत्यांचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचाही या यादीमध्ये समावेश आहे. या यादीमध्ये 80 जणांच्या नियमित सदस्यांव्यतिरिक्त 50 विशेष विशेष आणि 179 कायम निमंत्रित सदस्यांचाही समावेश आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीकडून सरकारपुढील आव्हानांबाबत धोरण निश्चित केले जाते. याशिवाय संघटनांत्मक संरचनेलाही आकार दिला जातो. करोनाच्या साथीमुळे भाजपची कार्यकारिणी दीर्घ काळापासून निश्चित केली जाऊ शकलेली नव्हती.