मुरादाबाद – पूर्वांचलचे अतिक अहमद, अश्रफ व मुख्तार अन्सारी आणि बिलारीचे शहाबुद्दीन हे जनसामान्यांप्रती कळवळा असलेले नेते होते. त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ तुम्ही समाजवादी पक्षाला मतदान करुन सपाचे उमेदवार विजयी करावेत, असे आवाहन सपाचे नेते हाजी मोहम्मद उस्मान यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
हाजी मोहम्मद उस्मान यांनी आवाहन केलेले हे लोक माफिया डाॅन होते आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या चकमकीत ते मारले गेले होते. शिवाय बुर्के यांनी हे विधान सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत केल्याने गांभीर्य वाढले आहे.
यूपीच्या संभल लोकसभा जागेसाठी बिलारी, मुरादाबाद येथे जाहीर सभेदरम्यान ही घटना घडली. लोकसभा निवडणुकीच्या २०१४ च्या तिसऱ्या टप्प्यात संभल लोकसभा जागेवर ७ मे रोजी मतदान होणार आहे. मुरादाबादची बिलारी विधानसभा जागा संभल लोकसभा मतदारसंघात येते. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी बिलारी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी सपा नेते हाजी मोहम्मद उस्मान यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सपाने यापूर्वी माजी खासदार शफीकुर रहमान बुर्के यांना संभल लोकसभा जागेसाठी उमेदवारी दिली होती. परंतु त्यानंतर त्यांचे निधन झाले. यानंतर सपाने संभलमध्ये डॉ. शफीकुर रहमान यांचे नातू झियाउर रहमान यांना उमेदवारी दिली. रविवारी अखिलेश यादव यांनी सपा उमेदवार झियाउर रहमान यांच्या समर्थनार्थ मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित केले.
हाजी मोहम्मद उस्मान म्हणाले, भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांवर खूप अत्याचार झाले आहेत. आझम खान यांच्यावर सरकारने अत्याचार केले आहेत. त्यामुळे तुम्ही लोकांनी अतीक अहमद, अश्रफ आणि मुख्तार अन्सारी यांच्या नावावर मतदान करून सपा उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत विजयी करा.