PM Narendra Modi | Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यानंतर आता येत्या 7 मे ला देशातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात 29 आणि 30 एप्रिल रोजी सहा सभा होणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी तीन सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर, कराड आणि पुणे येथे आणि मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे प्रचारसभा आहे.
दरम्यान, सोलापूर आणि साताऱ्यातील सभे नंतर पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल झाले असून, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, पुण्याचे उमेदवार मुरलीधऱ मोहोळ, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी मोदींनी प्रचार केला.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आधुनिक पायाभूत सुविधांमुळं आपल्यामध्ये एक विश्वास तयार होतो. यामध्ये पुणे मेट्रो पाहा, पुणे एअरपोर्टचं नवं रुप पाहा, पालखी मार्ग पाहा, समृद्धी महामार्ग पाहा, ठिकठिकाणी जोडली जाणारी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन्स पाहा. हे सर्व आधुनिक भारताची प्रतिमा आहे, जिवंत उदाहरण आहे.
पुणे वासियांनी लिहून घ्या महाराष्ट्रातील माझ्या बहिणभावांनो ही मोदींची गॅऱंटी आहे की तो दिवसही आता येईल जेव्हा तुम्ही देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल. काँग्रेसनं आपल्या १० दहा वर्षात पायाभूत सुविधांवर जितका खर्च केला यामध्ये मनमोहन सिंग यांच्या रिमोटवाल्या सरकारनं दिल्या नाहीत त्या आम्ही दहा वर्षात दिल्या.
पुण्यातील नागरिक आणि एकूणच महाराष्ट्रातील नागरिक लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास करतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणेकरांना दिला.
काँग्रेसने आपल्या 10 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवर जेवढा खर्च केला, पुणे कोणतीच गोष्ट विसरत नाही. आकडा लक्षात ठेवा. डॉ. मनमोहन सिंह यांचं जे रिमोटवालं सरकार होतं त्या सरकारने 10 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला तेवढा खर्च आम्ही 1 वर्षात करतो. आजचा भारत आपल्या युवकांचे संशोधन, टॅलेंट आणि टेक्नॉलिजवर विश्वास ठेवून पुढे जात आहे.
स्टार्टअप इंडियाचं कमाल पाहा, फक्त 10 वर्षात भारतीय युवकांनी सव्वा लाखापेक्षा जास्त स्टार्टअप बनवले आहेत. गर्वाची बाब म्हणजे यापैकी अनेक हे आपल्या पुण्यातील तरुण आहेत”, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज रेसकोर्सच्या मैदानावर मोदी बोलत आहेत…