…त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

आवश्‍यक उपाययोजना न केल्याचा ठपका

पिंपरी – कासारवाडी येथे ड्रेनेजचे काम करताना संरक्षक भिंती कोसळून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात ड्रेनेजचे काम करताना कोणत्याही संरक्षक उपाययोजना न केल्याप्रकरणी ठेकदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सनोज हितेंद्र ठाकुर (वय-32 रा. कासारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ठेकेदार संतोष हुन्नु राठोड रा.मोहन नगर चिंचवड व सुपरवायझर यशोधर गावीत रा. थेरगाव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासारवाडी येथील यशवंत सोसायटी जवळ ड्रेनेजचे काम सुरु होते.

खोदकाम करताना संभावित धोके लक्षात घेऊन ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची आवश्‍यक उपाययोजना करण्यात आली नव्हती. शनिवार दि. 4 मे रोजी दुपारी यशवंत सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये, फिर्यादी सनोज यांचा चार वर्षाचा मुलगा लोकेश तसेच काम करणारे मजूर शिवनारायण सोरेन, विष्णूदेव सोरेन (दोघे रा. पिंपरीगाव मूळ रा. झारखंड) हे तिघेजण अडकले होते. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर फिर्यादी यांच्या मुलाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच दोन कामगारही जखमी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.