बांधकाम साईटवरील दुसऱ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू

तळेगाव दाभाडे -बांधकाम साईटवरील दुसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथे ओसवाल जैन डेव्हलपर्स या बांधकाम साईटवर सोमवारी (दि. 6) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
प्रकाश ओमकार काकडे (वय 40, रा. डाळ आळी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक गुन्हे नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश काकडे हा ओसवाल जैन डेव्हलपर्सया नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करीत होता. सकाळी झोपेतून उठून चालत असताना, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मयताचा भाऊ विजय काकडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाय योजना केली याची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.