#CWC19 : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय

बर्मिंगहॅम – विजेतेपदाचा दावेदार असलेला भारतीय संघ ऑरेंज जर्सीमध्ये आजचा सामना खेळणार आहे. या सामन्यात इंग्लंडला पराभूत करीत उपांत्य फेरी गाठण्याचे वेध भारताला लागले असून बाद फेरीसाठी उत्सुक असलेल्या इंग्लंडलाही या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे.

विश्वचषक स्पर्धेतील भारत विरूध्द इंग्लंड या सामन्यास काही वेळातच बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.

 

दरम्यान, भारताने आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले असून न्यूझीलंडबरोबरचा सामना पावसामुळे धुवून गेला होता. हे अपराजित्त्व राखण्यासाठी भारतीय संघ कसोशीने प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत विजयासाठी भारताला संघर्ष करावा लागला असला तरी त्यानंतरच्या सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजला धूळ चारली आहे. या एकतर्फी विजयामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्‍वास आणखीनच बळकट झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)