ICC Men’s Player of the Month for February 2024 : अलीकडेच यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खूप धावा केल्या. या युवा फलंदाजाने 5 कसोटी सामन्यांच्या 9 डावात 712 धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने विक्रमी 2 द्विशतके झळकावली. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. त्याचवेळी, आता युवा सलामीवीराला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. वास्तविक, यशस्वी जैस्वाल याला आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ (फेब्रुवारी) पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. त्याने न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन आणि श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका यांना मागे सोडले ज्यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
Presenting the ICC Player of the Month for February 🙌
Congratulations, Yashasvi Jaiswal 👏👏
🗣️🗣️ Hear from the #TeamIndia batter on receiving the award@ybj_19 pic.twitter.com/tl1tJepdFJ
— BCCI (@BCCI) March 12, 2024
त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची अष्टपैलू खेळाडू ॲनाबेल सदरलँड हिला देखील ‘आयसीसी वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ (फेब्रुवारी) म्हणून गौरविण्यात आले आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत ॲनाबेल सदरलँडने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही आपली उत्कृष्ट कामगिरी केली होती.
जैस्वालने इंग्लंडविरुद्ध रचला धावांचा डोंगर…
यशस्वी जैस्वालबद्दल सांगायचे झाले तर, या युवा फलंदाजाने फेब्रुवारी महिन्यात खूप धावा केल्या. फेब्रुवारी महिन्यात यशस्वी जैस्वालने 112 च्या सरासरीने 560 धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शानदार पलटवार करत मालिका 4-1 अशी जिंकली. टीम इंडियाच्या यशात यशस्वी जैस्वालचा मोठा वाटा होता. या सलामीवीराने विशाखापट्टणम कसोटीत 209 धावा केल्या होत्या. त्याचवेळी त्याने राजकोट कसोटीत 214 धावा केल्या होत्या.
त्याच वेळी, यशस्वी जैस्वाल हा सप्टेंबर 2023 नंतर ICC प्लेयर ऑफ द मंथ बनणारा दुसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी शुभमन गिल सप्टेंबर 2023 मध्ये ICC प्लेयर ऑफ द मंथ बनला होता.
मी खूप आनंदी – जैस्वाल
या पुरस्कारानंतर यशस्वी जैस्वाल यांनी सांगितले की, “हा पुरस्कार जिंकल्यानंतर मी खूप आनंदी आहे, मला आशा आहे की येत्या काही दिवसांत त्याची पुनरावृत्ती होईल. इंग्लंडविरुद्धची ही माझी पहिली 5 कसोटी सामन्यांची मालिका होती, हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता.”