#CWC2019 : भारतीय संघात एक तर इंग्लंडच्या संघात दोन बदल

बर्मिंगहॅम – विजेतेपदाचा दावेदार असलेला भारतीय संघ ऑरेंज जर्सीमध्ये आजचा सामना खेळणार आहे. या सामन्यात इंग्लंडला पराभूत करीत उपांत्य फेरी गाठण्याचे वेध भारताला लागले असून बाद फेरीसाठी उत्सुक असलेल्या इंग्लंडलाही या लढतीत विजय मिळविणे अनिवार्य आहे. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ एकमेव बदल करण्यात आला आहे. युवा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याचे अपयश हीच समस्या आहे. त्यामुळे विजय शंकर यांच्याजागी ऋषभ पंत याला संघात स्थान देण्यात आले आहे.

तर दुसरीकडे इंग्लंड संघाने देखील आपल्या संघात बदल केलेला आहे. इंग्लंडने जेम्स विन्स आणि मोईन अली यांच्याऐवजी जेसन राॅय आणि लीयाम प्लंकेट यांचा संघात समावेश केला आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

इंग्लंड –

जेसन रॉय, जॉनी बेयर्सटो, जो रूट, इयोन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, क्रिस वोक्स, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जोफ़्रा आर्चर, मार्क वुड

भारत –

के एल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युज़वेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

 

Leave A Reply

Your email address will not be published.