मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती सोहळा मुंबईतील “गेट वे ऑफ इंडिया’ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची मोठी घोषणा केली. त्यांनी केलेल्या घोषणेनंतर उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे)ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल,
अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठा समाजबांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.