मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी नंतर आणि नव्या सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटी दरम्यानचे फोटो अमित शाह यांनी ट्विट केले आहेत. तसेच यावेळी शाह यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमित शाह यांनी शेअर केलेल्या फोटोसह “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे, असे म्हटले आहे.
महाराष्ट्र के नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उप-मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी से भेंट की और उन्हें शुभकामनाएं दीं।
मुझे विश्वास है कि श्री @narendramodi जी के मार्गदर्शन में आप दोनों पूरी निष्ठा के साथ जनता की सेवा कर महाराष्ट्र को विकास की नई ऊँचाइयों पर ले जाएंगे। pic.twitter.com/hmuO8SSwg8
— Amit Shah (@AmitShah) July 8, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दोघांनीही अमित शाह यांची भेट घेतली. आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट घेणार आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.
मुख्यमंत्री दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. तेथे त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होणार असल्याचे म्हटले आहे.