चीन-तैवान समझोता बातमीचा इन्कार
तैपेई, दि. 7 – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री डॉ. हेन्री किसिंजर यांच्या मध्यस्थीने तैपेई व पेकिंग हे शांततेच्या वाटाघाटी करीत आहेत, या टोकिओतून प्रसारित करण्यात आलेल्या वृत्तांचा तैवान सरकारने आज स्पष्टपणे इन्कार केला.
या वृत्तासंबंधी खुलासा करताना सरकारी प्रसिद्धी खात्याचे महासंचालक डॉ. डिंगे माऊ शिह म्हणाले, जपानी वृत्तपत्रातील हे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. या जपानी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, तैवान पुन्हा चीनमध्ये परत येण्यासंबंधी तैवानच्या राजदूतावासातील अधिकाऱ्यांनी पेकिंगमध्ये चीनच्या वरिष्ठ कम्युनिस्ट अधिकाऱ्यांची भेट घेतली. तैवान आपले लष्कर ठेवील, हे चीनने नाकारले आहे.
महिलांना समान हक्क देण्यास विरोध
पेशावर – पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना हक्क देण्याच्या प्रश्नावर पाकिस्तानात वादळ निर्माण झाले आहे. सरकारने स्त्री हक्क समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल नुकताच सादर केला आहे.
या समितीने इतर गोष्टींबरोबरच अशी शिफारस केली आहे की, स्त्रियांना कोर्टातून घटस्फोट घेण्याची परवानगी द्यावी, तसेच घटस्फोटित स्त्रियांना नवऱ्याच्या एकूण मालमत्तेपैकी आठवा हिस्सा द्यावा. मात्र कट्टरवाद्यांना या शिफारशी मान्य नसल्याने वाद निर्माण झाला आहे. जमियत उलेमाचे नेत्याने आपल्याला धक्का बसल्याचे सांगितले. “नवाई वक्त’ या पत्राने महिलांना समानहक्क दिले तर पुरुषांना काम मिळणे अवघड होईल.