भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri ) यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात उतरण्याअगोदर टीम इंडियाला एक सल्ला दिला आहे. शास्त्री यांच्या मते सेमीफायनल सामन्यात संघाने दिनेश कार्तिक नव्हे तर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला खेळवावे. इंग्लंडच्या संघाचं गोलंदाजी आक्रमण पाहता पंत संघासाठी ‘एक्स फॅक्टर’ठरू शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यात स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना १० नोव्हेंबरला ऍडिलेडच्या क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पंतला विशेष कामगिरी करता आली नव्हती मात्र इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भारतीय संघाला चांगला उपयोग होईल असे, रवी शास्त्री यांना वाटते.
“विराट कोहलीचा ‘तो’ Six पाकिस्तानी बॉलर कायम लक्षात ठेवणार”, रिकी पाँटिंगची प्रतिक्रिया!
रवी शास्त्री ( Ravi Shastri ) म्हणाले की, “दिनेश कार्तिक हा संघासाठी चांगला खेळाडू आहे, पण इंग्लंड किंवा न्यूझीलंडचे गोलंदाजी आक्रमण पाहता संघाला आक्रमक डावखुरा फलंदाजाची गरज भासेल. ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केलेली असून त्याने नुकताच एकदिवसीय सामनाही जिंकून दिला होता. ऋषभ पंतची निवड योग्य राहील कारण तो सेमीफायनल सामन्यात एक्स फॅक्टर ठरू शकतो.”
शास्त्री ( Ravi Shastri ) पुढे म्हणाले की, “ऍडिलेड मैदानाच्या सीमा लहान आहेत आणि खासकरून डावखुरा फलंदाजाला ते खूप उपयुक्त ठरू शकते. संघामध्ये एखादा आक्रमक डावखुरा फलंदाज असल्यास विविधता निर्माण होते. इंग्लंड संघाकडे चांगली वेगवान गोलंदाजी आहे. त्यामुळे अशा ठिकाणी डावखुरा फलंदाज उपयुक्त ठरेल. भारतीय संघाने सुपर-१२ मधील पाचपैकी चार सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकला संधी दिली होती. यादरम्यान तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही.”
भारतीय क्रिकेट संघाला सेमीफायनल सामन्यात १० नोव्हेंबरला ऍडिलेडमध्ये इंग्लंडचा सामना कार्याचा आहे. याआधी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघ दोन वेळा तर इंग्लंड संघाने एकदा विजय मिळवला आहे. तसेच दोन्ही संघांमध्ये शेवटचा टी-२० विश्वचषकातील सामना २०१२ साली खेळला होता, ज्यामध्ये भारतीय संघाने बाजी मारली होती.