मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना अंमलबजावणी संचनालयाने पीएमसी बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. यावर शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. पण महाविकास आघाडी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी काम सुरूच ठेवणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
संजय राऊत यांनी हे सर्व राजकारण असून ज्यांना करायचे आहे ते करु शकतात. मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार असल्याची सांगितले आहे.
दरम्यान, संपादक संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना अंमलबजावणी संचनालयाने पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेच्या घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले, त्यांना अंमलबजावणी संचनालयाने चौकशीसाठी 29 डिसेंबर रोजी हजर होण्यास सांगितले आहे, असे सूत्रांनी सांगितले.