मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत आजपर्यंत ईडीने तीन नोटीस पाठवल्या तरी उत्तर देण्यात आले नाही का असा सवाल केला आहे.
किरीट सोमय्या यांनी वर्षा राऊत यांच्यावरील कारवाईबाबत ट्विट करत म्हटले, “वयोवृद्ध गुंतवणूकदार ते पीएमसी बँक, पीएमसी बँक ते एचडीआयएल (वाधवान बंधू), एचडीआयएल ते प्रवीण राऊत, प्रवीण राऊत ते माधूरी प्रवीण राऊत, माधूरी प्रवीण राऊत ते वर्षा / संजय राऊत…गेल्या काही महिन्यात ईडीकडून तीन नोटीस…पण उत्तर नाही…का? लाभार्थ्यांना उत्तर द्यावेच लागेल”.
Senior Citizens Depositors
to #PMCBank
to #HDIL (Wadhwan Brothers)
to
Praveen Raut
to
Madhuri Pravin Raut
to
Varsha/ #SanjayRaut
1st Notice, 2nd Notice, 3rd Notice of ED in last few months, than also No Response!
Why?
Beneficiary ne Hisab to Dena Padega
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 28, 2020
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली असल्याचे सांगण्यात येत आहे.