MP Assembly Elections 2023 : देशात पाच राज्याच्या विधानसद्भा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मध्यप्रेदशमध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आता या चर्चांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना, ‘काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पाडण्याच्या भाजपच्या भ्रामक प्रचाराला बळी पडू नका. काँग्रेस एकजूट आहे. आपण सगळे मिळून काम करू आणि भाजपचा पराभव करू, ‘जनशक्ती’ जिंकेल, ‘मनी पॉवर’ हरेल.” असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला.
मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे, असा आत्मविश्वास दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केला. त्यासोबतच त्यांनी,”मी 30 (ऑक्टोबर) रोजी दतियाला जात आहे. दतियामध्ये नरोत्तम मिश्रा यांच्याविरोधात जनक्षोभ आहे. मी तिथे जाईन आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार जेव्हा अर्ज दाखल करतील, तेव्हा मी त्यांच्यासोबत असेन. हा बदल घडून आला आहे. जनतेला हवे आहे.” जो बदल हवा आहे, त्याच बदलासाठी आम्ही जनतेला या भ्रामक प्रचारापासून दूर राहण्याचे आवाहन करतो. भाजप आपल्या पैशाच्या ताकदीचा वापर करून खोट्या बातम्या पसरवत आहे. ही त्यांची रणनीती आहे.” असा आरोप त्यांनी यावेळी केला.
मेरी सभी मतदाता भाइयों एवं बहनों से प्रार्थना है कि वे कांग्रेस नेताओं में फूट के भाजपा के भ्रामक प्रचार के झांसे में न आएं। कांग्रेस एक जुट है। हम लोग सब मिलकर काम करेंगे और भाजपा को हराएंगे “जन बल” जीतेगा, “धन बल” हारेगा। कमलनाथ जी के नेतृत्व में कांग्रेस की सरकार बनेगी। pic.twitter.com/J5mtH7Wwxt
— digvijaya singh (@digvijaya_28) October 29, 2023
पुढे बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले की, राज्यात सरकार एकतर काँग्रेस किंवा भाजपचे बनणार आहे. या छोट्या पक्षांकडून येथे कोणतेही सरकार स्थापन होणार नाही. लोकांना बदल हवा आहे आणि हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही ही 20 वर्षांची कुशासन संपवून राज्यात काँग्रेसची सत्ता आणाल. काँग्रेसच्या राजवटीत आणि कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र काम करू. “असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.