“क्या लोग भाभीजी के पापड खा करके ठीक हो गये? “

खा. संजय राऊत यांनी संसदेत विचारला सरकारला प्रश्न

नवी दिल्ली : देशातील करोनाचा प्रसार अजूनही थांबलेला नाही. दिवसेंदिवस स्थिती गंभीर होत असून, दिवसाला एक लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून येत आहेत. देशातील करोना परिस्थितीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संसदेत सविस्तर निवेदन सादर केले. आरोग्य मंत्र्यांच्या निवेदनावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला सवाल केले. “हा राजकीय लढा नाहीये, लोकांचा जीव वाचवण्यासाठी लढाई आहे,” अशी टीकाही राऊत यांनी केली.

संसदेत बोलताना संजय राऊत म्हणाले,”माझ्या आई आणि भावालाही करोनाचा संसर्ग झाला होता. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. आज धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. बृह्नमुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे. काल काही सदस्यांनी महाराष्ट्रावर टीका केली, त्यामुळे मी हे सत्य सांगतोय,” असं संजय राऊत म्हणाले.

“मला सदस्यांना विचारायचं की असंख्य लोक करोनातून बरे कसे झाले? क्या लोग भाभीजी के पापड खा करके ठीक हो गये? ही राजकीय लढाई नाहीये, तर लोकांचे जीव वाचवण्याची लढाई आहे,” अशा शब्दात राऊत यांनी टीकाकारांना उत्तर दिलं.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातील करोना परिस्थिती आणि सरकारने केलेल्या उपाययोजनांविषयी संसदेत सविस्तर निवेदन केले. आरोग्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.