कंगनाची जीभ पुन्हा घसरली म्हणाली,’ती तर सॉफ्ट पॉर्न स्टार’

मुंबई –  कंगनाची वक्तव्ये पाहिली तर असे लक्षात येते की, तिच्या बोलण्यात वैचारिक सातत्य नाही. ती एकदा जे बोलते ते कदाचित तिलाही समजत नसावे. तिच्यावर विश्‍वास ठेवावा अशी ती व्यक्ती निश्‍चितच नाही. कंगना एक अत्यंत खोटारडी व्यक्ती आहे. तिच्यावर टीका करण्यात मला अजिबात रस नाही. मात्र, तिला कोणीतरी तिची जागा दखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सांगितले.

यातच, उर्मिला मातोंडकरने मांडलेल्या थेट मतावर कंगना रणौतने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  अत्यंत खालच्या पातळीवरची  टीका केली आहे. 

वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, ‘मी तिकीटासाठी भाजपाला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा आधारावर माझ्यावर हल्ला करणे. खरंतर मला तिकीट मिळणं फारसं कठीण नाही’. 

ती पुढे म्हणाली,’उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी ना? जर तिला तिकिट मिळू शकतं तर मला का नाही?’ 

दरम्यान, कंगना रणौतने केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरची  टीकामुळे सध्या सोशल मीडियावर  मिम्स तसेच हॅशटॅग वायरल होत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.