उपमुख्यमंत्री अजित पवार शाहू महाराजांच्या भेटीला; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केले ‘हे’ विधान

कोल्हापूर (प्रतिनिधी) – राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात न्यू पॅलेस वरती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली आहे.

तासभर सुरू असणाऱ्या या भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शाहू महाराज यांच्या मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली तसेच सध्या राज्यात सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांनी शाहू महाराजांच्या सोबत विशेष चर्चा केली.

अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेमधून राज्य सरकार सकारात्मक दिसते का असा प्रश्न विचारला असता ,माध्यमांशी बोलताना शाहू महाराज म्हणाले की राज्य सरकार सकारात्मक आहे, जे शक्य आहे ते नक्कीच होईल पण उद्या जर तुम्ही चंद्र पाहिजे सूर्य पाहिजे म्हणालात तर कसे आणून देणार?

तसेच केंद्र शासनाने जर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जर लक्ष दिले तर constitutional amendment करूनच तुम्हांला तुमचे पुढचे पाऊल टाकता येईल, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे शक्य आहे ते नक्की केले जाईल, असे शाहूमहाराज यांनी म्हटले आहे. तसेच मराठा आरक्षणा सोबतच विविध सामाजिक विषयांवर तीदेखील चर्चा झाल्याचं शाहूमहाराज यांनी म्हटले आहे ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते,

संबंधित बातम्या  –
मराठा आरक्षण: कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात; चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग
हाताला सलाईन, अंगात अशक्तपणा, तरीही धैर्यशील माने भर पावसात मराठा मोर्चात अग्रस्थानी!
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात संभाजीराजे यांचा मूक एल्गार
मराठा आरक्षण: मान-सन्मान राखून, करोनाचे नियम पाळून आंदोलन करू – संभाजीराजे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.