वाहत्या पाण्यात तरुणाचा बाईक स्टंट; नशीब बलवत्तर नाहीतर…, बघा व्हिडिओ

अकोला – राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या नाल्यांना पूर येण्यास काही ठिकाणी सुरुवात झाल्याचे बघलायला मिळत आहे. दरम्यान पावसाच्या पाण्यातून मोटार सायलक घेऊन जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. हा तरूण मोटार सायकलसह पाण्यात वाहून गेला आहे.

बार्शी तालुक्यातील सकनी लोहगड मार्गाजवळ मुसळधार पावसामुळे पूर आल्यासारखी परिस्थिती उद्भवली होती. यावेळी येथील तरुणाने वाहत्या पाण्यातून मोटार सायकलवर रस्ता पार करण्याचा प्रर्यंत केला. हा स्टंट या तरुणाच्या चांगलाच जीवावर बेतला असता. हा तरुण पोहता येत असल्याने बुडताना वाचला आहे. मात्र हा स्टंट जीवावरही बेतला असता.

दरम्यान. या तरुणाचा मोटार सायकलसह वाहत जात असतानाचा व्हिडिओ आला समोर आला आहे. ही घटना 10 जूनची असल्याचे समजत आहे. या व्हिडिओ मध्ये दिसतंय की तरुण कसा पाण्यात वाहून जात आहे. मात्र केवळ या तरुणाच नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला आहे. या तरुणाला पोहता येत असल्याने त्याने किनारा गाठला. आणि तेथे उभे असलेल्या गावकऱ्यांनी त्याला मदतीचा हात दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.