हाताला सलाईन, अंगात अशक्तपणा, तरीही धैर्यशील माने भर पावसात मराठा मोर्चात अग्रस्थानी!

कोल्हापूर – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज (दि. १६) कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनातून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला.

पावसाची तमा न करता हजारो कार्यकर्ते आंदोलनस्थळी हजेरी लावली आहे. पक्ष आणि संघटना विरहित या आंदोलनातून मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाची संघटित शक्ती एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अश्यातच शिवसेना नेते आणि खासदार धैर्यशील माने हे चक्क हाताला सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल झाले आहेत. मराठा समाजासाठी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी उपस्थित राहणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती, त्यानंतर धैर्यशील मानेंचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असली तरी ते आपल्या मराठा बांधवांसाठी पुढे आले आहेत.

संबंधित बातम्या  –
मराठा आरक्षण: कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात; चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात संभाजीराजे यांचा मूक एल्गार
मराठा आरक्षण: मान-सन्मान राखून, करोनाचे नियम पाळून आंदोलन करू – संभाजीराजे
उपमुख्यमंत्री अजित पवार शाहू महाराजांच्या भेटीला; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केले ‘हे’ विधान

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.