सातारा -जिल्ह्यातील आणखी 11 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 1449 इतकी झाली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वावरहिरे ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, भक्तवडी ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय महिला, तारगाव ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये घारेवाडी ता. कराड येथील 67 वर्षीय महिला, खेड बु ता. खंडाळा येथील 90 वर्षीय पुरुष, गांजे ता. जावळी येथील 65 वर्षीय पुरुष,
वडूज ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष तसेच शनिवार पेठ, कराड येथील 67 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुष, जैतापूर ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, आटके ता. कराड येथील 66 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.