IPL 2024, MS Dhoni creates history : पंजाब किंग्जविरुद्ध महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद झाला असला तरी या 42 वर्षीय अनुभवी खेळाडूने इतिहास रचला आहे. वास्तविक, आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीने यष्टिरक्षक म्हणून 150 झेल घेण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला यष्टिरक्षक ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकाही यष्टीरक्षकाने 150 झेल घेतलेले नाहीत, मात्र चेन्नई सुपर किंग्जच्या माजी कर्णधाराने वयाच्या 42 व्या वर्षी ही कामगिरी केली.
धोनीचा आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून विक्रम…
महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीपासून खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त हा खेळाडू रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग होता. आतापर्यंत आयपीएलच्या 261 सामन्यांमध्ये कॅप्टन कूलने यष्टिरक्षक म्हणून 150 झेल घेतले आहेत आणि 42 फलंदाजांना यष्टिचित केले आहे.
IPL 2024 (PBKS vs CSK Match 53) : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईविरूध्द पंजाबचा दारूण पराभव…
अशाप्रकारे यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनीने 192 फलंदाजांना बाद केले आहे. त्याचबरोबर दिनेश कार्तिक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिनेश कार्तिकने आतापर्यंत 245 आयपीएल सामन्यांमध्ये 141 झेल घेतले आहेत, तर 36 फलंदाजांना यष्टिचीत केले आहे.
Simarjeet strikes as the hosts sink further!#PBKSvCSK #TATAIPL #IPLonJioCinema #IPLinPunjabi pic.twitter.com/mlgpmxbPul
— JioCinema (@JioCinema) May 5, 2024
जितेश शर्माचा झेल घेत रचला इतिहास…
महेंद्रसिंग धोनीने पंजाब किंग्जविरुद्ध सिमरजीत सिंगच्या चेंडूवर जितेश शर्माचा झेल घेत आपला 150 वा झेल पूर्ण केला. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जचा 28 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 9 गडी गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात सॅम करनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 139 धावा करता आल्या.