World Cup 2023 South Africa vs Australia 2nd Semi-Final : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली असून आज जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होणार आहे.
AUS vs SA Live Score : दक्षिण आफ्रिकेची 47.3 षटकात नववी विकेट 203 धावांवर पडली. त्यापूर्वी, नुकतेच मिलरने आपले शतक पूर्ण केले आहे. मात्र, शतक झळकावल्यानंतर लगेचच मिलर कमिन्सचा बळी ठरला. पण मिलरने षटकार लगावत आपले खास शतक पूर्ण केले. मिलरच्या 101 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. मिलरमुळेच आफ्रिकेला 200 धावांचा टप्पा पार करता आला आहे. आफ्रिकेने 47.3 षटकात 203 धावांत 9 विकेट गमावल्या आहेत.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बावुमाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. लुंगी एनगिडीच्या जागी तबरेज शम्सीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दोन बदल केले आहेत. मार्कस स्टॉइनिस आणि शॉन अॅबॉट यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. गेल्या सामन्यात या दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती.