Urvashi Rautela : वर्ल्डकपच्या फायनल (World Cup 2023) सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियांने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्डकपची ट्रॉफी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसकडे सोपवली.
या ट्रॉफीसोबत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एन्जॉय करत होते. यावेळी काही खेळाडूंनी फॅमिलीसोबत ट्ऱॉफी घेऊन फोटो काढले. मात्र यावेळी मिचेल मार्शने (Mitchell Marsh) काढलेल्या फोटोवरून चांगलाच वाद निर्माण झाला.
View this post on Instagram
यावेळी मिचेल मार्शने मद्यपान करत असताना वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय देत फोटोसाठी पोझ दिली असल्याचं आपण पाहिलं. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोनंतर भारतीय चाहत्यांनी मात्र त्याला चांगलच धारेवर धरलं होत अनेकांची मनं देखील दुखावली आहेत.
दरम्यान, अश्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) एक खास पोस्ट शेअर करत मिचेल मार्शनला चांगलाच सुनावलं आहे. “भावा, वर्ल्डकप ट्रॉफीचा थोडा तरी आदर कर”, असं ती म्हणाली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) आपल्या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे, “मिचेल मार्शल भावा… वर्ल्डकप ट्रॉफीचा थोडा तरी मान ठेव…फक्त कूल दिसण्यासाठी मिचेलने ट्रॉफीवर पाय ठेवला आहे”. असं ती म्हणाली. चाहते अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे मिचेल मार्शलसाठी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.