Temba Bavuma In World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 चा दुसरा उपांत्य सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आल्यावर दक्षिण आफ्रिकेची स्थिती खूपच नाजूक दिसत आहे. संघाच्या खराब स्थितीसाठी कर्णधार टेंबा बावुमाला जबाबदार धरले तर चुकीचे ठरणार नाही. सलामीला आलेला कर्णधार बावुमा संपूर्ण स्पर्धेप्रमाणे उपांत्य फेरीतही फलंदाजी करताना अपयशी ठरला.
सलामीला आलेल्या कर्णधार बावुमाच्या लवकर बाद होण्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या अपेक्षित सुरुवात करता आली नाही. डावाच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बावुमा खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधाराच्या विकेटनंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळ आणखी बिघडला आणि 24 धावांपर्यंत संघाने चार विकेट गमावल्या. सलामीला आलेला कर्णधार टेंबा बावुमा लवकर किंवा खराब डाव खेळून परतण्याची ही पहिलीच वेळ नाही. बावुमाला संपूर्ण स्पर्धेत चांगली(अपेक्षित) कामगिरी करता आलेली नाही.
आफ्रिकेच्या कर्णधाराने या स्पर्धेत उपांत्य फेरीसह एकूण 8 डाव खेळले आहेत, ज्यामध्ये तो 40 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. बावुमाच्या खराब कामगिरीचा संघावर परिणाम होणे साहजिकच आहे कारण तो संघाला चांगली सुरुवात देण्यात सातत्याने अपयशी ठरला आहे. या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात बावुमाने श्रीलंकेविरुद्ध केवळ 8 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 35, नेदरलँडविरुद्ध 16, पाकिस्तानविरुद्ध 28, न्यूझीलंडविरुद्ध 24, भारताविरुद्ध 11, अफगाणिस्तानविरुद्ध 23 आणि उपांत्य फेरीत आज(दि.16 नोव्हेंबर,गुरूवार) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0 धावा केल्या.
#CWC23 #SAvAUS 2nd Semifinal : …तर दक्षिण आफ्रिकेचा संघ थेट अंतिम फेरीत
दरम्यान, भलेही संघाचा कर्णधार चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नसला तरी साखळी टप्प्यात आफ्रिका संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. 9 पैकी 7 जिंकल्यानंतर, आफ्रिकेने लीग टप्पा संपवला आणि पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थान मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता.