वाघोली (प्रतिनिधी) : करोनाविरुद्धच्या लढाईविरोधात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर देशातील विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. जवळपास एक महिन्यानंतर त्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी परवानगी मिळाली. मात्र परराज्यात अथवा परजिल्ह्यात प्रवास करण्यासाठी नागरिकांना फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यामुळे अनेक ठिकाणी आरोग्य केंद्रावर नागरिकांनी झुंबड केली आहे.
फिटनेस प्रमाणपत्र अत्यावश्यक असल्याने वाघोली (ता. हवेली) येथील बीजेएस कॉलेजमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पथकाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सकाळी १० वाजता लांबच लांब रांगा लावून नागरिकांनी गर्दी केली होती.