MS dhoni | Lok Sabha Election 2024 : 2024च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं असून, आता मतदान शेवटच्या टप्प्याकडे जाताना दिसत आहे.17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे. आज 25 मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.
सहाव्या टप्प्यात आज 8 राज्यांतील 58 जागांवर मतदान होत आहे, ज्यामध्ये दिल्लीतील सात जागांवर मतदान सुरू झाले असून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर देशात नवीन सरकार स्थापन होईल.
आज देशातील 58 जागांसाठी मतदान होत असून झारखंडमधील 4 जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्यामध्ये, रांची मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यामुळे, टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्जचा धडाकेबाज फंलदाच ‘महेंद्र सिंह धोनी’ने रांची येथील श्यामली मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
MS DHONI CASTS HIS VOTE IN RANCHI. pic.twitter.com/SXFe9KbnbG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 25, 2024
त्यावेळी, पत्नी साक्षी व माहीच्या आई-वडिलही मतदान करण्यासाठी आले होते. मात्र, यावेळी धोनीला पाहण्यासाठी मतदान केंद्रावर चाहत्यांची गर्दी होईल, हा अंदाज होताच. माहीची गाडी केंद्रावर येताच चाहते व माध्यमांनी त्याच्या गाडीला गराडा घातला होता. तर दुसरीकडे टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि भाजप खासदार गौतम गंभीरनेही दिल्लीतील मतदानाचा हक्क बजावला आहे.
हे देखील नक्की वाचा…
राहुल गांधींनी मतदानानंतर सोनिया गांधींसोबत घेतला सेल्फी; पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केले नाही