MLA Rakesh Daultabad Passed Away: लोकसभा निवडणुकी 2024 च्या सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान हरियाणामध्ये एका अपक्ष आमदाराचा मृत्यू झाला आहे. राकेश दौलताबाद असे मृत आमदाराचे नाव असून ते गुरुग्राम जिल्ह्यातील बादशाहपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार होते. शनिवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता गुरुग्राममधील पालम विहार मणिपाल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती खालावली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोकसभा निवडणूकीच्या मतदानादरम्यान आमदाराच्या निधनाने भाजपच्या गोटात शोककळा पसरली आहे. दौलताबाद यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता. त्यांच्या निधनावर भाजप नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
बादशाहपुर से विधायक और सदन में मेरे साथी श्री राकेश दौलताबाद जी के आकस्मिक निधन से स्तब्ध हूं। ईश्वर उनकी आत्मा को अपने श्री चरणों में स्थान दें और परिवार को यह दुख सहन करने की शक्ति दें।#RakeshDaultabad pic.twitter.com/zr1imi0YjU
— Gopal Kanda (@kanda_mla) May 25, 2024
मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला –
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि काँग्रेस आमदार गीता भुक्कल यांनी आमदाराच्या निधनावर शोक व्यक्त केला. शोक व्यक्त करताना काँग्रेसच्या आमदार गीता भुक्कल म्हणाल्या की, ही दुःखद बातमी आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ते त्यांच्या क्षेत्रात खूप सक्रिय होते आणि त्यांनी लोकांचे विशेषत: शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रश्न मांडले होते.
मुख्यमंत्री नायब सैनी यांनी शोक व्यक्त करताना सांगितले की, राकेश दौलताबाद यांच्या आकस्मिक निधनाने मी दुखी झालो आहे. ईश्वर त्यांना त्यांच्या पावन चरणी स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांनीही शोक व्यक्त केला आणि राकेश दौलताबाद यांच्या निधनाचे आकस्मिक वृत्त ऐकून धक्का बसल्याचे सांगितले. ईश्वर त्यांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना त्यांनी केली.
#WATCH | Haryana: Independent MLA from Badshahpur Assembly Rakesh Daulatabad passes away due to heart failure, Congress MLA Geeta Bhukkal says, “…It’s sad news. May God give strength to his family to bear this pain. He was very active in his region and all the issues of people… pic.twitter.com/f8db0A4DJ9
— ANI (@ANI) May 25, 2024
कोण होते राकेश दौलताबाद ?
राकेश दौलताबाद यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गुरुग्रामच्या बादशाहपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2019 मध्ये अपक्ष आमदार झाल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर करून खट्टर सरकारच्या स्थापनेत हातभार लावला. त्यांनी कोणत्याही अटीशिवाय भाजपला पाठिंबा दिला होता. कोरोनाच्या काळात जनतेला मूलभूत सुविधा दिल्याने दौलताबाद प्रसिद्धीच्या झोतात आले होते.