वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली तालुका हवेली येथील डी पी रस्ते करण्याची मागणी केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केली आहे.
वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. वाहतुक कोंडी ही सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्यावर उपाय म्हणुन वाघोली मध्ये सन 1994 पासुन डीपी रस्ते मंजुर आहेत सदरचे डीपी रस्ते हे पुणे नगर रोडला समांत्तर आहेत.
सदर डीपी रस्ते तयार केल्यास वाघोली येथील वाहतुक समस्या कमी होण्यास मदत होईल. याशिवाय डीपी रस्ते त्वरीत होणेकामी संबंधित विभागास योग्य ते आदेश व्हावेत अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दत्तात्रय दाभाडे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली आहे.
वाघोली येथील गायरान जमिन गट नं. 1119 व 1123 मधील एकुण 3.5 एकर जागेमधील विशेष बाब म्हणून मंजुर ट्रामा केजर युनिट इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे द्वारे मागणी केली आहे.
– रामभाऊ दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य