Lok Sabha Elections 2024 6th Phase Voting Live Updates: लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. आज 8 राज्यांतील लोकसभेच्या 58 जागांवर मतदान होत असून, सकाळी ठीक 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. आज मतदान होत असलेल्या 8 राज्यांतील 58 जागांसाठी एकूण 889 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे, त्यापैकी 8 पश्चिम बंगाल, 10 हरियाण, 7 दिल्ली, 4 झारखंड. जम्मू-काश्मीरमधील 1, ओडिशातील 6, उत्तर प्रदेशच्या 14 आणि बिहारच्या 8 जागांचा समावेश आहे.
49.2 pc voter turnout recorded in Phase 6 till 3 pm, West Bengal leads with 70.19 pc
Read @ANI Story | https://t.co/VIhQop8VMt#WestBengal #LokSabhaElections #VoterTurnout pic.twitter.com/PodaEGbOrZ
— ANI Digital (@ani_digital) May 25, 2024
पश्चिम बंगालमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 70.19 टक्के मतदान –
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात बंगालच्या मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दुपारी 3 वाजेपर्यंत बंगालमध्ये 70.19 टक्के मतदान झाले आहे आणि तरीही लोक मतदान करण्यासाठी बूथवर सतत येत आहेत. तर इतर सर्व राज्यांतील सरासरी आकडेवारी पाहता दुपारी तीन वाजेपर्यंत 49 टक्के मतदान झाले आहे.