मेलबर्न – करोनाचा धोका कमी झाल्याने जगभरात विविध स्पर्धा सुरू होत असताना ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर या स्पर्धांतील सामने पाहण्याची संधी प्रेक्षकांनाही देण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे.
मार्च महिन्यापासून जगभरात करोनाचा प्रसार वाढल्याने ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या. आता मात्र, देशातील स्थानिक स्पर्धा सुरु होत असल्याने त्यांच्या क्रिकेट मंडळालाही स्थानिक प्रायोजकांनी सहकार्य करण्याचे संकेत दिले आहेत.