CoronaUpdates : मुंबईला मागे टाकत दिल्ली ठरले सर्वाधिक बाधित शहर

नवी दिल्ली  – राजधानी दिल्ली हे करोनाच्या बाबतीत देशातील सर्वाधिक बाधित शहर ठरले आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 17 हजारापेक्षा अधिक रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रूग्णांच्या संख्येत या शहराने आता मुंबईलाही मागे टाकले आहे. मुंबईत एका दिवसांत सर्वाधिक रूग्ण आढळून आल्याची नोंद 4 एप्रिलला झाली होती. त्या दिवशी मुंबईत 11 हजार 163 रूग्ण आढळून आले होते.

गेल्या 24 तासांत दिल्लीत एकूण 17 हजार 282 रूग्ण आढळून आले आहेत. अपोलो हॉस्पिटलचे वरीष्ठ सल्लागार सूरजीत चॅटर्जी म्हणाले की, करोनाने दिल्लीत अक्षरश: हाहाकार माजवला आहे. या रोगाच्या लाटेत सर्वच वयोगटातील लोक सापडत असून ज्यांचे लसीकरण झाले आहे अशांनाही याची लागण होत आहे. बुधवारी या शहरात करोनामुळे 104 जण मरण पावले त्यामुळे शहरातील करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 11 हजार 540 इतकी झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.