मुंबई : जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे ४७ हजरापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर , या विषाणूची बाधा ९ लाख ३५ हजार ५५१ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. परंतु या जीवघेण्या आजारातून १ लाख ९४ हजार २६० जण ठठणीत बरे झाले आहेत.
या विषाणूमुळे सर्वाधिक १३ हजार १५५ मृत्यू इटलीत झाले असून स्पेन दुसऱ्या तर अमेरिका तिसऱ्या नंबरवर आहे. इटलीत या विषाणूमुळे ११ हजार ५७७ जणांना बाधा झाली आहे. तर १६ हजार ८४७ जण यातून बचावले आहेत.
याच बरोबर अमेरिकेत ५ हजार १०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २ लाख १५ हजार ७१ जणांना या विषाणूची बाधा झाली आहे. त्यापैकी ५ हजार ५ जणांची तबियत खालावली आहे.
तर दुसरीकडे स्पेनमध्ये १ लक्ष १० हजार ५७४ जणांना या विषाणूची बाधा झाली असून ३८७ जणांचा यात मृत्यू झाला आहे. तर २२ हजरापेक्षा जास्त कोरोनाबाधित बरे झाले आहेत.