मुंबई – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. काल संध्याकाळी काही प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी लक्षणे सौम्य आहेत. मी आता ठीक आहे आणि मी स्वतःला आयसोलेट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांनी खबरदारी घ्यावी अशी मी विनंती करते, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केली आहे.राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात गायकवाड या दररोज सहभागी होत आहेत. यातच आतच आता त्यांच्या संपर्कात आलेल्या नेत्यांनाही करोनाची लागण झाली असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.