नवी दिल्ली – दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचा दर 80 रुपयांनी वाढून 47,233 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील संकेतानुसार सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे दिसून येते.
दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 580 रुपयांनी वाढून 61,266 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,814 डॉलर स चांदीचा दर 23.07 डॉलर प्रति औंस झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेच्या कर्जराख्यावरील परतावा कमी झाल्यामुळे आणि डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली.