महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढला; सांगलीत करोनाचे पाच नवे रूग्ण

मुंबई –  राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, डोंबिवली, सातारा पाठोपाठ आता सांगली याठिकाणीही करोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत असून आज सांगलीत करोनाचे आणखी पाच रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यात करोना बाधितांचा एकदा ११२वर पोहचला आहे.

माहितीनुसार, सांगलीत एकाच कुटुंबातील पाच जण चार करोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यानं त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यांचे नमूने चाचणीसाठी पाठवल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११२ वर पोहोचली आहे.

राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या
पिंपरी-चिंचवड 12, पुणे 19, मुंबई 41, नवी मुंबई 5, कल्याण डोंबिवली 5, नागपूर 4, यवतमाळ 4, अहमदनगर 3, ठाणे 3, सातारा 2, पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार, पुणे ग्रामीण प्रत्येकी 1

Leave A Reply

Your email address will not be published.