नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाने केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांचे हरवलेले पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे की, ‘भाजप नेते रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांबाबत स्मृती इराणी मौन बाळगून आहेत.
स्मृती इराणी यांच्यावर हल्ला चढवत काँग्रेस पक्षाने आणखी एका ट्विटमध्ये आरोप केला आहे की, मंत्र्याने सोशल मीडियावर कुस्तीपटूंच्या निषेधाच्या प्रश्नांची उत्तरे लपवली आणि त्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक.’ असं लिहिलं आहे. यावर आता स्मृती इराणींकडून खोचक प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तसेच, आपल्या ट्वीटमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींनाही लक्ष्य केलं आहे
स्मृती इराणी यांनी ट्विट करत प्रति उत्तर दिले आहे की,’हे दिव्य राजकीय प्राण्या.., मी सिरसिरा गाव, विधानसभा सलून, लोकसभा अमेठी सोडून धुरमपूरकडे निघाले आहे. तुम्ही माजी खासदार शोधत असाल तर अमेरिकेशी संपर्क साधा. विशेष म्हणजे मोदी आडनाव प्रकरणी दोषी ठरल्यानंतर राहुल गांधींना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले आणि राहुल गांधींवर ताशेरे ओढत स्मृती इराणी म्हणाल्या की, माजी खासदाराचा शोध सुरू असेल तर अमेरिकेशी संपर्क साधा.’ या म्हणत इराणी यांनी प्रतिऊत्तर दिले आहे.