North Mumbai Lok Sabha Constituency 2024 : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून (Congress) भूषण पाटील ( Bhushan Patil ) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी भाजपकडून पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आता भूषण पाटील विरुद्ध पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्यात थेट सामना होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदेंकडून दोन उमेदवारांची घोषणा –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे. शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मुंबई वायव्यसाठी रवींद्र वायकर (Ravindra Waikar ) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दक्षिण मुंबईसाठी यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.