पुणे – अखेर प्रतीक्षा संपली असून बारावी पाठोपाठ आता SSC अर्थात इयत्ता दहावीचा निकाल देखील जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 2 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे.
यंदा तब्बल 16 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. ही परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली होती. राज्यभरातील 5 हजार 33 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती होती.
दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत विद्यार्थ्यांना होती.अखेर हा सस्पेन्स संपला असून आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. 2 जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
या साईटवरती पाहता येणार निकाल
mahresult.nic.in
https://ssc.mahresults.org.in
http://sscresult.mkcl.org