Congress Offers To Vanchit । राज्यात सर्वपक्षाचा जागावाटपाचा तिढा अजूनही सुटताना दिसून येत नाही. त्यातच वंचितने मविआची साथ सोडल्यानंतर जागा वाटप आणखीनच क्लिष्ट होऊन बसले आहे. वंचितने या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान या सगळ्या घडामोडीत आता वंचितला पुन्हा एकदा काँग्रेसकडून नवीन ऑफर देण्यात आलीय.
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत घेतलेल्या भुमिकेवर बोलतांना वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी म्हटले आहे की, “प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत समझोता करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे. काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवायला आणि केंद्रात मंत्रिपद द्यायला देखील तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आला आहे, अशी माहिती अनिस अहमद यांनी दिली.
आंबेडकरांमुळे बीजेपीला फायदा होईल… Congress Offers To Vanchit ।
2019 मध्ये ही प्रकाश आंबेडकर यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. या वेळेलाही प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकत नाही. मात्र, त्यांच्यामुळे बीजेपीला फायदा होईल असे आम्ही त्यांना कळविले आहे. प्रकाश आंबेडकर आमचे मोठे भाऊ असून, ते राज्यसभेत पाठवण्या संदर्भातल्या आमच्या प्रस्तावाला मान्यता देतील अशी अपेक्षा असल्याचेही अनिस अहमद म्हणाले आहे.
दोस्तीचा हात पुढं करायला तयार Congress Offers To Vanchit ।
प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत यावे यासाठी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आग्रही आहेत. “आम्ही अजूनही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करण्यासाठी तयार आहोत, तुम्हाला पाहिजे असलेल्या जागा पण द्यायला तयार आहोत. प्रकाश आंबेडकर यांना ज्या दोन जागा पाहिजे त्या द्यायला सुद्धा तयार आहोत. उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही वाट पाहत असून, मतांचं विभाजन नको यासाठी आंबेडकरांनी एकत्र यायला पाहिजे असेही” पटोले म्हणाले आहेत.
हेही वाचा
अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना अभय पाटील देणार आव्हान; काँग्रेसचे मराठा कार्ड यशस्वी ठरणार?