Aditi Sarangdhar Video| मराठमोळी अभिनेत्री अभिनेत्री अदिती सारंगधरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. खासगी वाहनसेवा देणाऱ्या कंपनीच्या गाडीतून प्रवास करताना आलेला अनुभव शेअर करत तिने संताप व्यक्त केला. अदितीनं कॅब चालकानं दिलेल्या वागणुकीबद्दलचा अनुभव या व्हिडिओद्वारे शेअर केला आहे.
अदिती पुण्यामध्ये ओला कंपनीच्या गाडीतून प्रवास करत होती. त्यावेळी तिची गाडीच्या वाहनचालकासोबत बाचाबाची झाली. अदितीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कॅब चालक गाडी चालवत अदितीसोबत बोलताना दिसत आहे. एसी चालू करण्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते आहे. चालकाचा व्हिडीओ शेअर करुन अदितीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, “हे पुण्यातील अतुल वाघ कॅब चालक आहेत. एसी एकवरच ठेवणार बसायचंय तर बसा नाही तर खाली उतरा. तक्रार करेन म्हंटल तर तुम्हाला काय करायचंय ते करा बिनधास्त असा उलट बोलला.” Aditi Sarangdhar Video|
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले की, “मला सुरुवातीला एक लोकेशन सांगून दुसरीकडे उभा राहिला आणि म्हणाला मला 7 मिनिटे वाट बघायला लावलीत मॅडम तुम्ही. त्याला विनंती केली प्लिज खिडकी उघडते खूप गुदमरत होते, तर तो चिडला. अत्यंत उद्धटपणे बोलत होता. अत्यंत अस्वच्छ आणि वास येणारी गाडी होती. काय करावा सांगा?”, असंही अदितीनं कॅप्शनमध्ये लिहिलं. प्रसिद्ध कॅब कंपनीला अदितीने ही पोस्ट टॅग केली आहे. Aditi Sarangdhar Video|
दरम्यान, आदितीच्या या पोस्टनंतर अनेकांनी या कॅब चालकावर संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी अदितीवर टीका केली आहे. ‘AC 1 वर ठेवून कोणी खिडकी उघडी ठेवत का?’, असा सवाल तिला नेटकऱ्यांनी केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा: