IPL 2024 (Lucknow Super Giants vs Mumbai Indians Match 48) : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 48 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज (मंगळवार, 30 एप्रिल) लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. मागील सामना गमावल्यानंतर दोन्ही संघ येत आहेत. मुंबई इंडियन्सला प्लेऑफसाठी पात्र ठरणे कठीण जात आहे, तर लखनौ अजूनही शर्यतीत आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला येथून सर्व सामने जिंकावे लागतील. अशा स्थितीत दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे.
गुणतालिकेतील स्थिती…
लखनौ आणि मुंबईला त्यांच्या मागील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. लखनौ सुपर जायंट्सचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला. या सामन्यात केएल राहुलचा संघ 196 धावांचा बचाव करू शकला नाही. दुसरीकडे दिल्लीचा सलामीवीर जेक फ्रेझरच्या झंझावाती खेळीने मुंबई इंडियन्सचा गेल्या सामन्यात धुव्वा उडाला. दिल्लीने 257 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 247 धावा करता आल्या आणि 10 धावांनी सामना गमवावा लागला. अशा स्थितीत दोन्ही संघांना विजय मिळवून लय मिळवायची आहे. आयपीएल 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सने 9 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स 9 पैकी पाच सामने जिंकून गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे.
हेड- टू- हेट रिकाॅर्ड
लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. यापैकी लखनौने तीन विजय मिळवले आहेत.
Pitch Report
लखनौमधील एकना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी अतिशय संथ आहे. फिरकीपटूंना येथे अधिक मदत मिळते. या खेळपट्टीवर फलंदाज अनेकदा संघर्ष करताना दिसतात. या मैदानावर 200 धावा सहजासहजी होत नाहीत. वेगवान गोलंदाजांनाही थोडीफार मदत मिळते. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 सामने जिंकले आणि दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने 1 सामना जिंकला. येथे जो संघ नाणेफेक जिंकतो तो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो.
कर्णधार आणि खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या ठरला फ्लॉप
IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. पण, तो आतापर्यंत कर्णधार आणि खेळाडू म्हणून अपयशी ठरला आहे. त्याने 9 सामन्यात 197 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत त्याने 56 च्या सरासरीने 4 बळी घेतले आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट 12 आहे.