Prakash Ambedkar Loksabha Election 2024 : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मात देण्यासाठी मेगाप्लॅन तयार केला आहे. 2 एप्रिल रोजी आम्ही सर्व काही स्पष्ट करणार आहोत. भाजप विरोधी सर्व संघटनांना एकत्र करून भाजपविरोधात नवीन आघाडी तयार करण्यात येणार असल्याचे मोठे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. महाविकास आघाडीमध्येच शिवसेना आणि काँग्रेस यांचे सूत जमलेले नाही असेही ते म्हणाले. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आंबेडकरांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी बोलतांना आंबेडकरांनी भाजपच्या विरोधात वेगळी आघाडी निर्माण करण्याचे स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले, मनोज जरांगेंशी लोकसभेसंदर्भात चर्चा झाली आहे. लोकसभेसंदर्भातच त्यांची भेट घेतली होती. त्यांचा लोकसभेबाबत डेटा शुक्रवारपर्यंत येईल आणि पुढची वाटचाल देखील येईल. | Prakash Ambedkar Loksabha Election 2024
यंदाच्या लोकसभेत 2 एप्रिलपर्यंत भाजप विरोधातली आघाडी उभी राहिलेली दिसेल. ज्या संघटनांशी आम्ही बोलतोय त्या संघटनांचा अजेंडा देखील समोर येत आहे. येत्या 2 तारखेला त्या संघटना कोणत्या हे देखील कळेल”, असे आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले. | Prakash Ambedkar Loksabha Election 2024
मजबूत आघाडी उभी करण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र दुर्दैवाने आम्हाला हवी त्यापद्धतीने आघाडी उभी राहत नव्हती. आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात आले. जोपर्यंत सुभाष देसाई यांच्याशी चर्चा होत होती, तोपर्यंत सर्व काही सकारात्मक होते. चर्चा पुढे जात होती. पण नंतर कुणी तरी कुणासाठी आम्हाला वापरून घेत असल्याचे दिसले, असा आरोपही आंबेडकरांनी मविआ नेत्यांवर केला आहे.
राऊत आघाडीत बिघाडी
आमचे दरवाजे आजही बंद झालेले नाहीत. सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत असे सूचक विधानही आंबेडकरांनी यावेळी केले. याशिवाय त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जहरी टीका केली आहे. संजय राऊत महाविकास आघाडीबाबत चुकीची माहिती देत आहेत. ते महाविकास आघाडीत बिघाडी करत आहेत. मला महाविकास आघाडीकडून माझा मतदारसंघ आणि इतर दुसऱ्या मतदारसंघाचा प्रस्ताव आला होता, असेही त्यांनी म्हटले. | Prakash Ambedkar Loksabha Election 2024
सुशांत सिंहच्या जिगरी मित्राचा अपघात ! छिछोरे फेम अभिनेता गंभीर जखमी
उदयनराजेंना महायुतीने डावलल्यास तुम्ही तिकीट देणार का ? शरद पवार कॉलर उडवत म्हणाले..