लेह (लडाख) :- सध्या लडाखच्या दौऱ्यावर असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी त्यांच्या लेहच्या मुख्य बाजारपेठेला भेट दिली आणि बाजारात लोकांशी संवाद साधला.
राहुल गांधी गुरुवारी या केंद्रशासित प्रदेशाच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी लेहमध्ये आले आणि नंतर त्यांनी आपला येथील मुक्काम 25 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. गेले काही दिवस ते येथे जाहीसभाही घेत आहेत, लोकांशी संवाद साधत आहेत आणि मोटारसायकलवरून या परिसराची राईडही करीत आहेत.
चीनने या प्रदेशात मोठ्या प्रमाणात घुसखोरी केल्याची माहिती येथील लोकांना आपल्याला दिली आहे,असे नमूद करीत त्यांनी नुकताच केंद्र सरकारवरही निशाणा साधला होता.
या वर्षी राहुल गांधी यांनी दोनदा जम्मू-काश्मीरला आले होते परंतु त्यांनी लेह लडाखला भेट दिली नव्हती. त्यामुळे यावेळी ते खास लडाख भेटीसाठी आले आहेत.