Congress in Arunachal Pradesh। लोकसभा निवडणूकीपूर्वी ईशान्यकडील अरुणाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय . निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या 4 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकलाय. या सर्व आमदारांनी भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतलंय. या आमदारांमध्ये काँग्रेसचे 2 (निनॉन्ग एरिंग आणि वांगलिन लोआंगडोंग) होते, तर यानंतर काल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते लोम्बो तायेंग यांनीही सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला
४ आमदारांचा भाजप प्रवेश Congress in Arunachal Pradesh।
पूर्व सियांग जिल्ह्यातील मेबो येथील सहा वेळा आमदार लोम्बो तायेंग यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासह तिरप जिल्ह्यातील अपक्ष आमदार चकट अबो यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्यापूर्वी, पक्षाचे आणखी दोन आमदार – निनॉन्ग एरिंग आणि वांगलिन लोआंगडोंग आणि एनपीपीचे दोन आमदार मुचू मिठी आणि गोकर बसर यांनी रविवारीच भाजपमध्ये प्रवेश केला.
Giving another jolt to Congress, HMLA from Mebo Constituency Shri Lombo Tayeng ji joined BJP today reposing his faith and trust in the leadership of HPM Shri @narendramodi ji and HCM Shri @PemaKhanduBJP ji along with HMLA Smti Chakat Aboh ji, (Ind) who also expressed her… pic.twitter.com/4V3dvaFf2Y
— BJP ArunachalPradesh (@BJP4Arunachal) March 4, 2024
अरुणाचल प्रदेश संघटन प्रभारी आणि राज्य युनिट पक्षाचे अध्यक्ष अशोक सिंघल, राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या उपस्थितीत या चार नेत्यांना भाजपचे सदस्यत्व देण्यात आले. एनपीपी हा अरुणाचल प्रदेशातील सत्ताधारी भाजपचा मित्रपक्ष आहे.
सभागृहात काँग्रेसचा फक्त 1 आमदार शिल्लक Congress in Arunachal Pradesh।
पूर्वीच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री असलेल्या लोम्बो तायेंग यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत असताना बाजू बदललीय. सध्या काँग्रेसकडे माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांचा सभागृहात फक्त 1 आमदार शिल्लक आहे. त्याच वेळी, 2019 मध्ये, 60 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसने 4 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत 3 जागांवर तोटा झाला आहे. राजकीय वर्तुळात हा पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
राज्य विधानसभेतील एकूण 60 सदस्यांपैकी भाजपचे मित्रपक्षांचे संख्याबळ आता 57 वर पोहोचले आहे. त्याचवेळी सभागृहात काँग्रेसची संख्या 1 वर आली आहे, तर 2 अपक्ष सदस्यही आहेत. एप्रिल-मे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसोबतच अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.