कोयनानगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांच्या विकासकामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिली.
पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विषयांसंदर्भात आज मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला बंदरे व खनीकर्म मंत्री दादा भुसे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विकास निधी, वांग- मराठवाडी प्रकल्पातील अंशतः बाधितांना रोख रक्कम स्वरूपात मोबदला देण्याबाबत, तसेच कोयना भूकंपग्रस्तांच्या वारसांना दाखले देणे आदी विविध विषयांबाबत त्यांनी देसाई यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
Maharashtra : पोषक वातावरणामुळे राज्यात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ – उपमुख्यमंत्री फडणवीस
त्याचबरोबर पाटण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या वाढीव कामासाठी निधी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पाटण तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक निर्णय घेत आहोत. जिल्ह्यातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास ना. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलो.