इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या हत्येच्या प्रयत्नातील दोषी व्यक्तीच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राणा मोहम्मद नाविद असे या व्यक्तीचे नाव आहे. लाहोर उच्च न्यायालयाने नाविदच्या सुटकेचे आदेश दिले होते. मात्र पाकिस्तान सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आणि नाविदची तातडीने सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
जनरल मुशर्रफ यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल नाविदला 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र तो गेल्या 20 वर्षांपासून तुरुंगात आहे. त्यापूर्वी नाविदला फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 2005 साली त्याच्या फाशीच्या शिक्षेला जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये परावर्तित केले होते.
नाविदबरोबर याच गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेल्या अदनान खान याचीही फाशीची शिक्षा 2015 मध्ये जन्मठेपेमध्ये बदलण्यात आली होती. न्यायालयाकडून दोषी ठरवले जाण्यापूर्वीचा कालावधी कक्षात घेऊन फिल्ड जनरल कोर्ट मार्शल कायद्याच्या आधारे माफी देण्याच्या तरतूदीनुसार नाविदच्या सुटकेचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
China : चीनमधील आगीत 38 जणांचा होरपळून मृत्यू; आग विझवण्यासाठी…
23 डिसेंबर 2003 रोजी तत्कालिन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर प्राणगातक हल्ला करण्यात आला होता. मुशर्रफ यांच्या वाहनांच्या ताप्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून स्फोट घडवण्यात आला होता. त्यामध्ये मुशर्रफ तोडक्यात बचावले होते. मात्र 6 पोलीस आणि 4 सैनिकांसह 16 जण ठार झाले होते. लष्करी वाहनात असल्यामुळे मुशर्रफ बचावले होते.